एकूण ठेवीच्या ७० ते ७५% कर्ज वाटप करणे हे सुरक्षिततेचे लक्षण असते. समाजातील सर्वच घटकांना सर्वच प्रकारची सुरक्षीत कर्ज वाटणे हे मोठे दिव्य असते. तारणी कर्ज हे तारण मालमत्तेच्या ५०% पर्यंतच देणे हे अतिशय सुरक्षीत कर्ज वाटपाचे द्योत्तक असते. विनासायास वसूल होणारे कर्ज संस्थेसाठी अमृतासमान असते. निव्वळ एनपीए ५ % पेक्षा कमी असणे हे संस्थेच्या हिताचे असते.