संचालक मंडळाच्या भरवशावर सभासद संस्थेमध्ये ठेवी ठेवतात. ठेवीदारांना चांगली सेवा कर्मचारी देतात त्यामुळे ठेवीदार संस्थेबरोबर जोडला जातो, आणि यातूनच ठेवीदारांचा विश्वास संस्थेवर दृढ होतो. आणि मग ठेवीदार अगदी बिनधास्तपणे ठेवी ठेवतात व इतरांना सुद्धा ठेवी ठेवण्यासाठी कळत नकळत परावृत करत असतात. ठेवीदार हा संस्थेचा आत्मा आहे.